(दापोली / सुदेश तांबे)
दापोली नगरपंचायतीच्या वतीने व नगराध्यक्षा ममताताई मोरे यांच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या तायक्वांदो खेळाच्या माध्यमातुन मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाला सुरुवात झाली. प्रशिक्षणाचे उद्घाटन नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन न.पं. दापोलीचे मंगेश जाधव यांनी केले तर प्रस्तावना प्रदिप रजपुत यांनी मांडली. उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्षा ममताताई मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेचे संदिप चव्हाण, नगरसेविका रियाताई सावंत,अश्विनीताई लांजेकर, तांबे काकी, नगरपंचायतचे मंगेशजी जाधव, स्वप्निल महाकाळ, शिल्पाताई तांबे, सानियाताई तळघरकर, निलेश पवार तसेच देवेश खानविलकर, रसिकाताई मांगले, प्रियांका रजपुत, प्रथमेश दाभाळे सर, संदेश चव्हाण, शैलेश मिसाळ सर, बहुसंख्य पालकवर्ग तसेच प्रशिक्षणार्थी मुली उपस्थित होत्या. तसेच नगरपंचायत समुदाय संघटीका श्रीम. सांबरे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.