( जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या परिवारात नव्याने दाखल झालेल्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाकडून करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. या प्रसंगी सर्व प्राध्यापक वर्गाने त्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाज, विविध विभाग, महाविद्यालयीन राबविले जाणारे उपक्रम, शिस्त आणि फायदे या विषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या स्नेहा पालये यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देत असताना मिळणाऱ्या सर्व संधीचा लाभ घेवून स्वतःची प्रगती करा असे आवाहन केले. यानंतर नवीन महाविद्यालयाशी एकरूप बनविले. सर्व नवीन विद्यार्थ्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

