(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
गुरव ज्ञाती समाज संस्थेतील आर्थिक व्यवहारा संदर्भात अनेक महिने विचार विनिमय करून आर्थिक व्यवहारातील अफरातफरी संदर्भात वाशी येथे दिनांक २३ जून २०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी निवडून आलेली कार्यकारिणी बरखास्त झाल्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले.
या बैठकीत पुढील संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी सर्वानुमते ५ निरीक्षक नेमण्यात आले. या संस्थेचे कार्यक्रम ५ निरीक्षक व सर्व संस्थेचे सभासद यांच्या अधिपत्याखाली घेण्यात येतील असे ठरविले आहे. तत्पूर्वी अनेक वेळा सभा झाल्या तरी या समाज विघातक व्यक्ती स्वतः गैरहजर राहून समाज बांधवांना वेठीस धरत होत्या. हे समाज विघातक बांधव स्वतःच्या मनमानी कारभाराने वर्धापन दिनाचा कार्यक्रम करीत आहेत. त्या संदर्भात गुरुवार, दिनांक ०३.०४.२०२५ रोजी झालेल्या गुरव ज्ञाती समाज संस्थेचे दादर कार्यालय येथे निरीक्षक व सभासद यांची संयुक्त सभा झाली.
या सभेत समाज संस्थेचा वर्धापन दिन निरीक्षक व संस्थेचे सभासद यांच्या अधिपत्याखाली होईल, तसेच या कार्यक्रमात बरखास्त कार्यकारिणी सभासद यांचा कुठलाही हस्तक्षेप चालून घेतला जाणार नाही. हा वर्धापन दिन व त्या अनुषंगाने होणारे सर्व कार्यक्रम समाज शिस्तबद्ध पद्धतीने तसेच शांततापूर्वक व्हावेत असे दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून याची सर्व गुरव ज्ञाती समाज बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहे.