(चिपळूण)
तालुक्यातील शिरगाव बाजारपेठ आणि पेढांबे परिसरात वाहने रस्त्यावर अयोग्य प्रकारे उभी करून वाहतुकीस अडथळा आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण केल्याप्रकरणी दोन वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२७ जून २०२५ रोजी दुपारी १२.१० वाजता चिपळूण-कराड रोडवरील शिरगाव बाजारपेठेत राजेंद्र रामचंद्र जाधव (रा. तळसर) यांनी त्यांची मारुती इको (क्र. एम.एच.०४-जी.जे-३२०७) ही चारचाकी रस्त्यावर अशा पद्धतीने उभी केली होती, की त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच पादचाऱ्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला. याप्रकरणी निखिल युवराज जगदाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत, दुपारी १२.४० वाजता पेढांबे येथील मंदार कॉलेजजवळ चिपळूण-अलोरे अंतर्गत रस्त्यावर फारुख अहमद मुल्लाजी (रा. पोफळी) यांनी त्यांची टाटा मैजिक (क्र. एम.एच.०८-डीआर-३५९८) ही वाहतुकीच्या दिशेला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली होती. यामुळेही पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. याबाबतही निखिल जगदाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.