(रत्नागिरी)
कॉम्रेड्स मॅरेथॉन – जगातील सर्वात जुनी, खडतर आणि प्रतिष्ठेची अल्ट्रा मॅरेथॉन! साऊथ आफ्रिकेतील पिटर्समारीट्झबर्ग ते डरबन या सुमारे ९० किलोमीटर अंतराच्या अत्यंत आव्हानात्मक शर्यतीत, १२ तासांच्या आत चढ-उतार, प्रतिकूल हवामान आणि मानसिक-शारीरिक थकव्यावर मात करत, प्रसाद देवस्थळी यांनी ही शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण करत रत्नागिरीचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केलं आहे!
🏅 कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक असलेल्या प्रसाद देवस्थळी यांच्या या अभूतपूर्व यशाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी,
आपण सर्वांनी एकत्र यावं, ही मनापासून विनंती!
📍 स्थळ: साळवी स्टॉप, रत्नागिरी
🕔 वेळ: १३ जून, संध्याकाळी ५ वाजता
🏍️ स्वागत रॅली मार्ग: साळवी स्टॉप ते मारुती मंदिर (मोटारसायकल रॅली)
✨ रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन आणि सुवर्णसूर्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने,
संपूर्ण रत्नागिरीकरांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण उपस्थित राहून प्रसाद देवस्थळी यांचा मनःपूर्वक सन्मान करावा.
या एका पावलाने त्यांनी संपूर्ण कोकणाचा मान उंचावला आहे… आता आपल्या टाळ्यांनी त्यांच्या यशाचा गौरव करूया!