(राजापूर)
राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील गिजमवाडीमध्ये बुधवारी (११ जून २०२५) सायंकाळी सुमारे पाच वाजता विजेचा शॉक लागून १३ वर्षीय स्वरांगी संदीप गिजम हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, संदीप गिजम यांचे कुटुंब शेतातील कामासाठी घराबाहेर गेले असताना स्वरांगी घरी एकटीच होती. यावेळी घरातील पंख्याच्या उघड्या वायरला तिचा स्पर्श झाल्यामुळे तिला तीव्र विद्युत धक्का बसला. घरात कोणीही नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही. या धक्क्याने स्वरांगीचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंबीय शेतातून परत आल्यानंतर हा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.