(राजापूर / तुषार पाचलकर)
तळवडे आंबेवाडी आदर्श शाळा नं. २ येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षपदी सौ. अस्मिता सचिन बळकटे यांची एकमताने निवड झाली असून उपाध्यक्षपदी प्रदीप गोसावी यांची सलग दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून पत्रकार सुरेश गुडेकर यांची निवड करण्यात आली.
ही निवड सौ. आरती हातणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पार पडली. नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारिणीचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सदर समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक अनाजी मासये यांनी नव्या समितीला मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवीन शाळा व्यवस्थापन समिती
अध्यक्ष: सौ. अस्मिता सचिन बळकटे, उपाध्यक्ष: प्रदीप गोसावी, सचिव: अनाजी मासये, सदस्य: सौ. आरती मोहन हातणकर, निलेश केशव हातणकर, रंजना मारुती साळवी, सौ. मनिषा कलमस्टे, सौ. रत्नप्रभा रबसे, सौ. सानिका राणे, सौ. आदिती पानकर, सुरेश गुडेकर, विजय हातणकर, नरेंद्र शितप, राजेश साळवी, दत्ताराम चव्हाण, शिक्षक प्रतिनिधी: सौ. सुजाता बारसकर
नवीन समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ठोस उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

