(रत्नागिरी)
रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात धडक कारवाई करण्याबाबत भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने दि. 19/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस पथक रत्नागिरी शहरात गस्ती घालत असताना गांजाचे सेवन करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांचे पथक रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील शिरगांव, शेटयेवाडी या ठिकाणी गस्त घालत असताना महालक्ष्मी मेडीकल स्टोअरच्या पाठीमागे दोन इसम बसून चिलीम सदृश्य साहीत्याच्या सहाय्याने तोंडातून वारंवार धूर काढत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्यांची खात्री केली असता ते गांजा हा अमली पदार्थ ओढत असल्याने निष्पन्न झाले. यामध्ये शब्बीरअली शहानवाझ पटेल ( वय 28 वर्षे, रा. घर नंबर 225, रहेबर मोहल्ला, साखरतर, ता. जि. रत्नागिरी ), शफाकत हसन आदम राजपुरकर ( वय 36 वर्षे, रा. घर नंबर 222, अकबर मोहल्ला, साखरतर, ता. जि. रत्नागिरी ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या संशयित आरोपीं विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस कायद्या अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 152/2025 अन्वये दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्रीमती जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक स्था.गु.अ.शा रत्नागिरी, सपोनि प्रमोद वाघ, सपोफौ/सुभाष भागणे, पोहवा / शांताराम झोटे, बाळू पालकर, प्रविण खांबे, अमित कदम, गणेश सावंत, विवेक रसाळ, योगेश शेटये स्था.गु.अ.शा रत्नागिरी, यांनी केलेली आहे.