( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मंथन आर्ट स्कूल रत्नागिरी यांच्या मंचावर संवादाची मूलतत्वे या विषयांतर्गत ‘चित्रभाषा आणि साहित्य’ या विषयी मार्गदर्शन संपन्न झाले. हे मार्गदर्शन जितेंद्र पराडकर सर यांनी केले.
या कार्यशाळेत त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासातील अनमोल क्षण साहित्य भाषेतून कसे व्यक्त करावे, यावर विवेचन केले. कलाशिक्षक म्हणून कार्यरत असतानाही त्यांची अप्लाईड आर्टची आवड त्यांनी जोपासली. कलाशिक्षक,पत्रकार ते संवेदनशील लेखकापर्यंतचा प्रवास त्यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत गंमतीशीरपणे मांडला. चित्रकार ते चित्रपठणकार यातील त्यांचे अनुभव कथन करत चित्र वाचनाची भाषा त्यांनी सांगितली.
पत्रकारीतेतून त्यांनी कलेसाठी दिलेले योगदान, चित्रकलेतही शिस्तप्रिय विद्यार्थी घडवणे, पत्रकार म्हणुन सामाजिक बांधिलकी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व आज मंथनच्या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले. कलाकाराला दिसणारं सौंदर्य हीच त्याची चित्रभाषा असते हे त्यांनी त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनातून समजावले.कार्यक्रमाची सुरुवात जितेंद्र पराडकर यांना शाखाप्रमुख प्रा.संदेश पालये यांच्या हस्ते शाल, रोपटे, मंथनची ओळख असणारी डायरी देऊन करण्यात आली. याप्रसंगी प्रा. प्रतिक्षा पांचाळ आणि विद्यार्थी उपस्थित होते.