(राजापूर)
मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी पेट्रोलपंपा समोरील रोडवर एस.टी. बसने भरधाव व निष्काळजीपणे चालवत पुढे जाणाऱ्या ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक दिली. ही घटना दि. २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.
राजापूर आगाराची एस.टी. (क्र. MH 09 FL 1075) ही बस श्रीकृष्ण सहदेव खाकने (वय ४० वर्षे) यांच्या ताब्यात होती. त्यांनी निष्काळजीपणे वाहन चालवून ट्रक (क्र. GA 04 T 7283) ला जोरदार धडक दिली. या प्रकरणी वाहतूक निरीक्षक स्वप्नील शंकर कदम (वय ३३, एस.टी. आगार राजापूर) यांनी फिर्याद दिली असून, आरोपी चालकावर गु.र.नं. ७४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.