(रत्नागिरी)
नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कर्जतहून वैभव गारवे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. ते कर्जत नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून काम करत होते. त्यामुळे तुषार बाबर यांची कार्यमुक्ती झाली आहे.
तुषार बाबर यांनी मागील चार वर्षे रत्नागिरी नगरपालिकेचा कारभार समर्थपणे सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात तारांगण प्रकल्प, शिवसृष्टी, थ्रीडी मल्टिमिडिया शो, काँक्रिट रस्ते आणि पाणीयोजना यांसारखी अनेक महत्वाची कामे पूर्णत्वास गेली. “रत्नागिरीकरांनी मला भरभरून प्रेम आणि सहकार्य दिले. यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे,” अशी भावना बाबर यांनी यावेळी व्यक्त केली.