( राजापूर / तुषार पाचलकर )
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात दिली आहे. यामध्ये पाचल गावच्या जनतेने सलग तिन वेळा निवडून दिलेले पाचल गावचे माजी सरपंच श्री अशोक रघुनाथ सक्रे यांची दक्षिण रत्नागिरीतून राजापूर लांजा-साखरपा-विधानसभा क्षेत्रात विधानसभाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा राजापूर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यालयात ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग उपळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी राजापूर तालुका प्रमुख कमलाकर कदम, शहर प्रमुख संजय पवार, पाचल विभाग विलास नारकर सह राजापूर तालुक्यातील अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होतें. यावेळी शिवसेना नेते व माजी खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
अशोक सक्रे हें गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठेने काम करत आहे. त्यांनी या आधी शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून काम पहिले आहे. पक्षाने विश्वास ठेऊन माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून यापुढे जिल्ह्यात मी पक्ष संघटना वाढीसाठी व पक्षमजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं.