(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील ऐतिहासिक टेहेळणी गड भवानगड येथे दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे श्रमदान मोहीम करण्यात आली. या मोहिमेची सुरुवात रविवारी सकाळी ठिक ६ वाजता करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित सर्वांशी ओळख करून घेऊन साफसफाईच्या कामाला सुरूवात करण्यात आली. या मोहिमेत भवानी मंदिराच्या जवळ असणाऱ्या पाण्याची टाकी काळाच्या ओघात गाळाने भरलेल्या टाकीपैकी त्यातील २ पाण्याची टाकी या मोहिमेत साफ करण्यात आली.
या मोहिमेत तब्बल ३० दुर्गवीरांनी सहभाग नोंदवला.सबंध चिखलाने वेढलेल्या टाक्यातील दीड फुटाचा गाळ टाक्या व चिखल बाहेर काढण्यासाठी दुर्गवीर जोमाने श्रमदान केले. या मोहिमेत दिप्ती साळवी, प्रतिक्षा बाईत, सेजल वास्कर, सलोनी सनगले, तेजल डाफळे, स्नेहल कोकरे, चैत्राली सुर्वे, रोहित बालडे, योगेश सावंत, निशांत जाखी, मंगेश शिवगण, हर्षद सनगले, अक्षय गवंडी, प्रणव राक्षे, उत्कर्ष माने, रोशन भाटकर, शुभम आंबेकर, स्वप्नील सापते, स्वरूप नलावडे, श्रेयस शेट्ये, स्वप्नील पाडावे, अक्षय महादे, आकाश शिर्के, ओंकार सावंत, यश कदम, करण हुमणे, यश सावंत, भावेश सावंत, स्वरूप मांजरेकर, प्रमोद कुलकर्णी, अक्षय पाटील या दुर्गविरांनी सहभाग घेतला.
या मोहिमेतील दुर्गवीर आकाश शिर्के यांनी सांगितले की, ‘मोहिमेला न येण्याची कारण खूप असतील, पण तिथे श्रमदान करण्यासाठी येण्याचं कारण एकच असत ते म्हणजे आपल्या हातून ह्या गड कोटांसाठी काहीतरी झालं पाहिजे. ह्याच जोशाने प्रत्येक दुर्गवीर हा आपल्या गड-कोटांचे संवर्धन अविरतपणे करत राहील.