(देवळे / प्रकाश चाळके )
लांजा राजापूर साखरपा मतदार संघाचे आमदार किरण(भैया)सामंत यांच्या काम करण्याच्या धडाक्याने प्रेरित होवून व माजी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थित साखरपा विभागातील शेकडो कार्यकरर्त्यानी मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी शिवसेनेत प्रवेश केला. योगायोगाने ऊ.बा.ठा.ला एप्रिल फुलच केले नव्हे तर दाभोळे जि.प. गटात भुईसपाटच केले म्हटल तर वावग ठरु नये.
तालुक्याचे माजी सभापती जया माने यानी या प्रवेशाच्या वेळी म्हटले की आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर व विकास कामाचा धडाका पाहून आपण शिवसेना मूळ प्रवाहात सामील होत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत देवडे सरपंच विलास कांगणे, किरबेट – भोवडे सरपंच प्रणिता कांबळे, उपसरपंच सतीश कांबळे, प्रशांत अडबल,,कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी, भडकंबा माजी सरपंच शेखर आकटे, युवासेना तालुकाप्रमुख केतन दुधाने, सरपंच सिद्धी कटम, सुरेश कदम, उपतालुकाप्रमुख कमलेश मावळणकर, जयश्री मांडवकर, मोहन माईन, अजमिना रमदूल, मुस्लिम मोहल्ला कार्यकर्ते, बाईत वाडी कार्यकर्ते , साखरपा सरपंच रुचिता जाधव, उपसरपंच शशांक लिंगायत, सुमित वाघधरे, विजय पाटोळे, राजा वाघधरे, साळसकर मॅडम, कुरुप मॅडम, धीरज लिंगायत, सचिन अंकुशराव, कुमार जाधव,दीपिका सुतार, विलास साळस्कर, प्रकाश माने, राकेश चव्हाण, अनंत पांचाळ, प्रकाश कांबळे, सुरेश सुर्वे, रवी सावंत, तिवरे मेढे शाखाप्रमुख संतोष सुर्वे, किसन सुर्वे घाटीवळे मधील शाखाप्रमुख रवी कामेरकर, उपसरपंच लक्ष्मण शिंदे, सरपंच जाधव मॅडम यांच्यासह साखरपा विभागातील शेकडो शिवसैनिकानी जया माने यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी जया माने यांच्या प्रवेशाचे स्वागत व शुभेच्छा आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू शेट्ये यांनी दिल्या. त्याचबरोबर आमदार किरण सामंत यांनी मतदारसंघात कामाचा धडाका कायम ठेवणार असून पक्ष संघटना वाढीसाठी मेहनत घेण्याचे आव्हान केले. या विभागात आलेल्या सर्वांचे स्वागत असुन येथे जुना नवा असा दुजाभाव होणार नाही असा ही शब्द देताना जुन्या कार्यकर्त्यावरही आन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असे म्हणत सर्वानी पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करु असे म्हटले.
यावेळी व्यासपिठावर आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख राजेश पत्याणे, बापू शेट्ये ,राजू कुरूप, जिल्हा बँकेचे संचालक खामकर,जगदीश राजपकर,महिला उपजिल्हाप्रमुख भाग्यश्री सुर्वे, संजय सुर्वे,बापू लोटणकर, बापू शिंदे, विलास भाई बेर्डे,नेत्रा शिंदे,लक्ष्मण कदम, राजेश कामेरकर, प्रकाश चाळके ,रेश्मा परशेट्ये ,प्रसाद अपंडकर, अंकुश सर्वे , पिंट्या देवळेकर ,सुशांत सुर्वे,मनोहर सुकम, दत्ता घुमे, सुभाष सुर्वे.बंड्या माने, बापू शिँदे , काशिनाथ सकपाळ, शुभम गांधी,प्रकाश सकपाळ,चंद्रकांत गोसावी, संजय पाष्टे, मनोहर गोवरे, दत्ता वाघधरे, विलास सुकम प्रकाश आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापू शिँदे यानी केले.