(रोहा)
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा रोहा (जि. रायगड) येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत ४०० गरजूंना ब्लॅकेट कीटचे वाटप करण्यात आले.सुरुवातीला जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर सिद्ध पादुकांची रायकर पार्क नगर पालिका ते गौळवाडी मैदान अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. गौळवाडी मैदानावर दर्शन सोहळा झाला. भक्तांनी रांगेने दर्शन घेतले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट कीट वाटपाचा कार्यक्रम झाला. या कीटमध्ये उशी, चादर, चटई यांचा समावेश आहे. अशी ४०० कीट देण्यात आली.
मोलमजुरी करणाऱ्या तसेच हातावर पोट असणाऱ्या गरजूंची नेमकी प्राथमिक आवश्यकता ओळखून संस्थानाने केलेल्या या मदतीबद्दल लाभार्थ्यांनी आभार मानले आहेत.
यावेळी रोह्याचे माजी नगराध्यक्ष लालता सेठ कुशवाह, ओबीसी जिल्हा अध्यक्ष सुरेश शेठ मगर, ओबीसी रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे, तंटा मुक्ती अध्यक्ष मोरेश्वर त्ररिवले, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश खराडे, अमोल सांगले, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष किरण मोरे, नंदू महाराज तेलंगे आदी मंडळी उपस्थित होती. तसेच स्वस्वरूप संप्रदायाचे पदाधिकारी, तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी संस्थानच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.