(जैतापूर / राजन लाड )
आपल्या ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे मी आज आमदार… आता आपल्या सगळ्यांची सेवा करणे ही माझी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले. राजापूर तालुक्यातील मिठगवाने येथील पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संस्था मिठगवाणेच्या वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान ते बोलत होते.
पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संस्था मिठगवाणे संस्थेचा स्नेहवार्षिक स्नेहमेळावा रविवार दिनांक ९ मार्च २०२५ श्री देव अंजनेश्वर देवस्थान सभागृह मिठगवाणे येथे संपन्न झाला.या स्नेह मेळाव्याला आमदार किरण सामंत यांनी उपस्थिती लावली. ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने आमदार किरण सामंत यांचा जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपण सगळ्यांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा माझ्या माध्यमातून जे जे आपल्यासाठी करता येईल ते करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचा शब्द यावेळेस आमदार किरण सामंत यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला.
यावेळी ज्येष्ठांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती सावित्री कनेरी आणि प्राजक्ता मराठे यांनी दिली. तर अनेक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
वस्त्रहरणकार गंगाराम गव्हाणकर यांनी आपल्या व्हाया वस्त्रहरण या आत्मचरित्रातील किस्से सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर, रत्नागिरी कुवारबाव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती आंब्रे,जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास चालके, जिल्हा नियोजनचे सदस्य राजू कुरूप, दीपक कुवळेकर, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे , अशपाक हाजू ,विलास चेऊळकर ,दीपक नागले, श्रीधर पावसकर,एकनाथ आडिवरेकर,रमेश राणे,श्रीकृष्ण मयेकर, मधुकर पावसकर ,सत्यवान कणेरी ,मनिषा काजवे ,आनंदा मोरे, सावित्री कणेरी आदींसह सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु बी कांबळे यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता मुंबईवरून आलेले पावसकर बंधू यांनी राज्यगीत सादर करून केली. स्नेहमेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.