(बीड)
सरपंच हत्या प्रकरणातील फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले. आता आणखी दुसऱ्या एका प्रकरणातील कुरतेचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाला आहे. यात एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली जात आहे. हा व्हिडीओ शिरूर तालुक्यातील असल्याची चर्चा आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण करत आहेत. एकाने दोन्ही पाय धरले, तर दुसरा बॅटने पायावर आणि इतर ठिकाणी अमानुषपणे मारहाण करीत आहे. यात पीडित व्यक्ती ओरडत असतानाही त्याला मारहाण सुरूच होती. त्यानंतर दुसरा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात जखमी व्यक्ती एसपी ऑफिसमध्ये आला होता. मात्र, यात गुन्हा दाखल नाही.
‘तो’ आ. धसांचा कार्यकर्ता
आ.धस म्हणाले, भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे. व्हिडीओ पाहिल्यावर मी पोलिसांना फोन केला. छेडछाडीवरून हा प्रकार घडल्याचे सांगितले. माझा कार्यकर्ता असला तरी गुन्हा दाखल करा, असे सांगितल्याचे आ. धस यांनी सांगितले.