(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत केंद्र शासन नवीन कायदा अंमलबजावणी अनुषंगाने जाकादेवी येथील श्री. काळे यांचे मंगल कार्यालय हॉल येथे तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आलेली आहे. सदर कार्यशाळेकरीता प्रमुख मार्गदर्शक श्री. अमित वायकुळ, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांनी सन २०२३ नव्याने अस्तित्वात आलेल्या खालील कायदया प्रमाणे मार्गदर्शन केलेले आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता .भारतीय साक्ष कायदा याविषयीची बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच श्री. पांडूरंग नंदिवाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी तसेच श्री. राजेंद्र यादव, पोलीस निरीक्षक रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सायबर ऑनलाईन फसवणूक व त्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, पोक्सो कायदा अनुषंगाने मार्गदर्शन केले आहे. यावेळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक व खालगावचे बीट अंमलदार महेश टेमकर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास जाकादेवी- खालगांव पंचक्रोशी प्रतिष्ठीत ग्रामस्थ, रिक्षा संघटना पदाधिकारी, व्यापारी संघटना पक्षाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व पोलीस पाटील असे एकूण ७५ पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक तसेच तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाचे ८० विद्यार्थी विद्यार्थीनी- शिक्षक वर्ग उपस्थित होते.