(गणपतीपुळे / वैभव पवार)
थिबा राजाकालीन बुद्धविहार रत्नागिरी येथे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी चे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक सुहास कांबळे यांनी केले. सदरचा कार्यक्रम रत्नागिरी तालुका बहुजन पंचायत समिती व भारतीय बौद्ध महासभा मीराताई (आंबेडकर गट) या दोन्ही संस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला.
प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले .त्यानंतर भारतीय संविधानावर शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आयु. नंदकुमार यादव बौद्धाचार्य संजय कांबळे, माजी तहसीलदार विजय जाधव, मिलिंद कांबळे, सुहास कांबळे व अध्यक्ष आयु. प्रकाश पवार यांनी भारतीय लोकशाही संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले इशारे याबाबत अत्यंत वस्तुस्थितीला धरून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुहास कांबळे यांनी मानले.