(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटन असलेले गणपतीपुळे दिवाळी पर्यटन हंगामाच्या गर्दीने बहरले आहे. या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाला विविध ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांची मोठी पसंती मिळत असून शनिवार रविवार आणि संपूर्ण दिवाळी असलेल्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांच्या गर्दीने गणपतीपुळे बहरून जात आहे. एकूणच गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरा दर्शनासाठी भाविक व पर्यटकांची गर्दी होत असून समुद्रकिनाऱ्यावरील समुद्र स्नानाचा व वॉटर स्पोर्ट जलक्रीडेचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आनंद घेताना दिसून येतात. तसेच समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध सुविधानी पर्यटक आकर्षित होत आहे.
गणपतीपुळे मंदिराला देखील विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याने मंदिर पूर्णपणे सजले आहे. तसेच मंदिरात सायंकाळी होत असलेला दीपोत्सव पर्यटकांचा खास आकर्षित करत आहे. एकूणच हॉटेल्स व लॉजिंग मध्ये पर्यटकांची गर्दी दिसत असून संपूर्ण गणपतीपुळे तीर्थक्षेत्र पर्यटकांच्या गर्दीने बहरून जात आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे ग्रामपंचायत देवस्थान प्रशासन पोलीस यंत्रणा एमटीडीसी या सर्व यंत्रणांकडून सोयी सुविधांची ज्ययत तयारी करण्यात आली असून पर्यटकांना विविध सोयी सुविधा देऊन पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.