‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अवघ्या 70 दिवसांमध्ये संपणार असून पाचव्या पर्वाचा महाविजेत्याची घोषणा आज केली असून बारामतीचा सुरज चव्हाण हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. रितेश देशमुख याने केले विजेत्याच्या नावाची घोषणा पाचवं पर्व यंदा 28 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. सीझनमध्ये एकूण 16 स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात सहभाग घेतला होता. या 16 जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून सुरज चव्हाण यांने या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सूरज चव्हाण याला बिग बॉसकडून 14 लाख रूपयांचे मिळाले. तर गायक अभिजीत सावंत यावेळी रनरअप ठरला आहे.
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनालेच्या टॉप 2 फायनलिस्टपर्यंत अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघे पोहोचले. निकी तांबोळी ही बिग बॉसच्या टॉप 3 मधून बाहेर पडली. सूरज चव्हाण हा ज्यावेळी बिग बॉसच्या घरात दाखल झाला. त्यावेळी अनेकांनी भूवया उंचावल्या. सूरज चव्हाण अत्यंत साधा दिसतो. अस्सल ग्रामीण भागातून सूरज आलाय. सुरूवातीच्या काळात सूरजच्या खाण्यावरून आणि राहण्यावरून बिग बॉसच्या घरातील काही सदस्य त्याची खिल्ली उडवताना दिसले. आता तोच सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरला आहे. कलर्स वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची घोषणा या ग्रँड फिनालेमध्ये केली आहे.
सूरज चव्हाण हा मुळ बारामतीचा असून तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. सूरजच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. तो लहान असतानाच त्याच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्याकडे राहण्यासाठी साधे घर देखील नाहीये. सूरजवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम करत भरभरून मते लोकांनी त्याला दिली.
सूरज चव्हाण याचे शिक्षणही अत्यंत कमी झाले असून त्याला मराठी देखील वाचता येत नाही. शिकलेला नसल्याने त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे सुरजने सुरुवातीला या कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. बिग बॉस मराठीच्या टीमने त्याची त्याच्या गावी जाऊन समजूत काढली होती. त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता बारामतीचा किंग ठरला आहे. सूरज चव्हाणची तरूणाईमध्ये एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ तयार करत ग्रामीण भागातील मुले सूरज याला मत देण्यासाठी विनंती करत होते.