(फुणगूस / एजाज पटेल)
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) अमरावती येथे मेनिंगो एन्सीफॅलोसील (मेंदुशी/न्यूरो) संबंधीत जटील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. सदर रुग्ण बैतूल, मध्यप्रदेश येथील असून रुग्ण ११ वर्षीय मुलगी आहे. सदर रुग्णास कानाचा त्रास असल्यामुळे पाच वर्षांपूर्वी कानाची शस्त्रक्रिया केलेली होती. त्यानंतर २ वर्षांनी कानामधून पाणी येत असल्याने सदर रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे तपासणीसाठी गेली असता तिला होत असलेला त्रास बघुन रुग्णाचा एम.आर.आय. करण्यात आला व त्यामध्ये असे लक्षात आले की, मेंदूमधील सेलेब्रल फायनल फ्लूइड, कणामधून येतं होतें, म्हणजे त्या मुलीच्या डाव्या कानामधून सारखे २-३वर्षापासून पाणी येत होते. एम.आर.आय.मध्ये असे सुद्धा लक्षात आले की, कानामध्ये गाठ सुद्धा आली आहे व मेंदूचा भाग कानामध्ये येतं होता. त्याचप्रमाणे वारंवार ताप येणे, फिट येणे, असा त्रास सुद्धा रुग्णास सुरू होता.
सदर रुग्णास नागपूरला उपचारासाठी जाण्यास सांगितले होते. मात्र रुग्णाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील नाक कान घसा तज्ञ डॉ. श्रीकांत महल्ले यांनी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथील न्यूरो सर्जन यांच्याशी संवाद साधून सदर शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे एकाच वेळी कानची व मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती चांगली आहे.
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथे अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदा करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोसर्जन डॉ.अंकुश वानखडे, डॉ. योगेश सावदेकर, डॉ. अमोल ढगे, नाक, कान, घसा तज्ञ डॉ. श्रीकांत महल्ले, डॉ. मंगेश मेंढे, बधिरिकरन तज्ञ डॉ. राखी वानखडे, डॉ बाळकृष्ण बागवाले डॉ दिपाली देशमुख, आर.एम्.ओ. डॉ. माधव ढोपरे, अधिसेविका चंदा खोडके, माला सुरपाम यांच्या मार्गदर्शनाखाली इंचार्ज सिस्टर दिपाली देशमुख, मनीषा रामटेके, तेजल बोंडगे, निकिता पाझारे, आकाश काळे, रोहित ताथोडे, वेदांत व राहुल आदींचे शस्त्रक्रियेत मोलाची योगदान होते.
न्युरो सर्जन अंकुश वानखडे देवमाणूस
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्याधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या डॉक्टरांनी शास्त्रक्रियेसाठी अंत्यत मोलाची भूमिका बजावली. त्या डॉक्टर समूहातील न्युरो सर्जन डॉ. अंकुश वानखडे यांनी काही वर्षापूर्वी संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैध्यकीय अधिकारी म्हणुन अतिशय उत्तम प्रकारे व प्रामाणिकपणे काम केल असून डॉक्टरांमधील देवमाणूस म्हणुन डॉ. अंकुश वानखडे यांची संगमेश्वर परिसरात ख्याती होती.