(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील देऊड, सुतारवाडी येथील प्रसिद्ध मेस्त्री म्हणून सुपरिचित असलेले ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक श्री.राजाराम तुकाराम पांचाळ यांचे वयाच्या ९० व्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्याने खालगाव- जाकादेवी येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.
कै. राजाराम पांचाळ हे अतिशय कष्टाळू, मनमिळावू व परोपकारी व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक माणसे जोडली व शेवटपर्यंत जपली. ते उत्तम कारागीर होते.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे,पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल देऊड व जाकादेवी खालगांव परिसरातून दुःख व्यक्त होत आहे.