(रत्नागिरी / संतोष पवार)
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गडहिंग्लजचे कोषाध्यक्ष, परिश्रम विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, राजापूर डी.एड. कॉलेजचे नावलौकिक संपादन केलेले माजी प्राचार्य डॉ.श्री. एम. के. कांबळे यांच्या मातोश्री श्रीम.सत्येवा खेमाणा कांबळे यांचे रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी राहत्या घरी हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले.
दिवंगत सत्येवा खेमाणा कांबळे या अतिशय प्रेमळ ,कष्टाळू, परोपकारी वृत्तीच्या होत्या.शिक्षणाविषयी त्यांच्या मनात प्रचंड निष्ठा होती.त्यांनी काबाड कष्ट करून आपल्या मुलांना उच्चशिक्षण देऊन कर्तबगार बनविले. दिवंगत खेमाणा कांबळे या भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा चंदगडचे माजी संस्कार समितीचे उपाध्यक्ष पी. के. दिक्षीत यांच्या त्या मातोश्री होत. कालकथित सत्येवा खेमाणा कांबळे यांचे वृधापकाळने निधन झाल्याने परिसरातून दुःख व्यक्त होत आहे.
त्यांचा जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम बुधवार दि ११ रोजी सकाळी १० वाजता पंचशील निवास नवीन वसाहत दुंडगे तालुका गडहिंग्लज येथे आयोजित करण्यात आला आहे.

