(दापोली / वार्ताहर)
तालुक्यातील उंबर्ले गावचे कार्यरत पोलीस पाटील संतोष बाळू नाचरे (वय वर्षे ४०) यांचे रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विजेच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. या दुर्दैवी घटनेत त्यांच्या वडिलांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
संतोष नाचरे यांच्या निधनाने उंबर्ले गावात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर आज (सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर) रोजी सकाळी ठीक ९ वाजता उंबर्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दापोली तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने संतोष नाचरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


