(रत्नागिरी / प्रतिनिधी)
प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गणेश पांडुरंग सपल (वय ५२, रा. पतित पावन मंदिरामागे, फाटक हायस्कूलसमोर, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश सपल यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळी १०.५७ वाजता त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १३४/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.


