(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दम्याचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ५८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंगा विश्वनाथ थोरात (वय ५८, रा. त्रिमूर्ती हाऊसिंग सोसायटी, आदर्शनगर, कुवारबाव, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगा थोरात यांना दम्याचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू असताना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.१२ वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नोंद क्रमांक १९४/२०२६ असा आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.


