(राजापूर/ तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील रहिवासी बाजीराव रावजी साबळे (वय ६०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. आज (बुधवार, २१ ऑक्टोबर) रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे पत्नीसोबत रायपाटण येथील नदीवर मासेमारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने पत्नीने तत्काळ आजूबाजूच्या ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी साबळे यांना उपचारासाठी जवळच्या रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.


