(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जांभरुण बौद्धवाडी येथील रहिवासी जनार्दन विठ्ठल सावंत यांचे मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
जनार्दन सावंत यांनी मुंबई येथे नोकरी करत असतानाही जांभरुण येथील भारतीय बौद्ध महासभेच्या स्थानिक शाखेत सक्रियपणे आणि उत्तम प्रकारे कार्य केले. तसेच, मुंबई शाखेचे माजी खजिनदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे जनार्दन सावंत यांचा समाजातील सर्वांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. प्रत्येकाची प्रेमाने विचारपूस करणे आणि आपुलकीने संवाद साधणे, हा त्यांच्या स्वभावाचा विशेष होता. त्यांनी आपल्या कुटुंबाचेही आदर्श पद्धतीने पालनपोषण केले. त्यांच्या निधनाने जांभरुण येथील भारतीय बौद्ध महासभेच्या स्थानिक शाखेसह मुंबई शाखेच्या वतीने दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
दिवंगत जनार्दन सावंत यांचा जलदान विधी आणि श्रद्धांजली सभा रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जांभरुण येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.


