(रत्नागिरी / वैभव पवार)
जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या संगमेश्वर तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
निवडीनुसार मनिष जाधव यांची तालुकाध्यक्षपदी, वैभव जाधव यांची तालुका सचिवपदी, तर निलेश पिळणकर यांची तालुका कोषाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य गजानन साळुंखे, जिल्हा कोषाध्यक्ष विवेक गावडे, आरोग्य सहाय्यक संदीप खेडसकर व विनोद शिंदे, आरोग्य सेवक शिवराज शेट्ये, संतोष भोसले, विश्वनाथ घाणेकर, सुमेध यादव, राजेंद्र घाणेकर, आरोग्य सेविका तेजस धुमक, डी. एस. सांडीम तसेच हिवताप कर्मचारी संघटनेचे संजय मांडवकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटना अधिक सक्षम करण्याबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

