(रत्नागिरी / वार्ताहर)
देवरुख येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये १०, ११ व १२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत खेडशी तायक्वांदो स्पोर्ट्स सेंटरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत २३ पदकांची कमाई केली. रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत जिल्हाभरातील सुमारे ५०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. खेडशी तायक्वांदो स्पोर्ट्स सेंटरच्या खेळाडूंनी क्योरुगी (फाईट) प्रकारात १० सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्य, तर पूमसे प्रकारात ४ रौप्य पदके पटकावत एकूण २३ पदकांवर नाव कोरले.
सुवर्णपदक विजेते :
स्मित अमित जाधव, रिधान स्वप्नील कदम, ईरा कुलदीप खातू, निधी दीपक पवार, आदित्य किशोर साळवे, शिवांक प्रतीक झिमण, आरोही हेमंत जाधव, आर्या किशोर साळवे, सुयश संतोष झोरे आणि नेहा राजेंद्र पवार.
रौप्यपदक विजेते (क्योरुगी) :
गार्गी निखिल आंब्रे, नीरजा संदीप कांबळे, सांची सचिन कांबळे, अथर्व अनंत पांचाळ आणि स्वरूप प्रदीप साळुंखे.
कांस्यपदक विजेते :
अर्हा अमरदीप आयरे, पूर्वी दामोदर चव्हाण, ओजस्वी संदीप कांबळे आणि अंतरा नंदकुमार सावंत.
पूमसे प्रकारातील रौप्यपदक विजेते :
श्रीमयी प्रतीक झिमण, अर्हा अमरदीप आयरे, नीरजा संदीप कांबळे आणि स्वरा मंगेश जाधव.
या यशाबद्दल रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, खजिनदार शशांक घडशी, खेडशी तायक्वांदो सेंटरचे अध्यक्ष सुबोध विजय कांबळे, राजेंद्र पवार, प्रमुख प्रशिक्षक अमित जाधव, सहाय्यक प्रशिक्षक प्रतीक पवार व सुमेधा जाधव तसेच रत्नागिरी अर्बन बँकेचे संचालक सुजित झिमण यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

