(ग्लासगो / वृत्तसंस्था)
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ (Commonwealth Games 2026) उद्या २३ जुलैपासून स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरु होत आहेत. यंदाच्या स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन आणि नेमबाजी या भारतासाठी पदकांची मोठी संधी असलेल्या खेळांचा समावेश नसल्यामुळे भारताच्या एकूण पदकसंख्येवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तरीही भारताकडून सुमारे १२५ खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लव्हलिना बोरगोहाई, तेजस्विन शंकर, मुरली श्रीशंकर, प्रियांका गोस्वामी यांसारख्या स्टार खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असणार आहे.
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत १० प्रमुख खेळांमध्ये २१५ पदक स्पर्धा होणार आहेत. भारतीय खेळाडू विविध स्पर्धांमध्ये कधी मैदानात उतरतील, याचे संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारताचे संपूर्ण वेळापत्रक
२४ जुलै (शुक्रवार)
बॉक्सिंग: प्रीती पवार (५४ किलो), जस्मिन लंबोरिया (५७ किलो), सुमित कुंडू (७० किलो)
पॅरा पॉवरलिफ्टिंग: अशोक मलिक, परमजीत कुमार, सुमन देवी
इतर: महिलांच्या विविध वजनगटातील स्पर्धा
२५ जुलै (शनिवार)
3×3 बास्केटबॉल: भारत विरुद्ध वेल्स
कलात्मक जिम्नॅस्टिक्स: प्रणती नायक, निष्का अग्रवाल
जलतरण: धक्शन शशिकुमार, चैतन्य कुलकर्णी
बॉक्सिंग: परवीन हुड्डा, अरुंधती चौधरी, लव्हलिना बोरगोहाई
२६ जुलै (रविवार)
वेटलिफ्टिंग: ऋषिकांत सिंग, मीराबाई चानू, एम. राजा
बॉक्सिंग: कपिल पोखरिया, नरेंद्र बेरवाल
व्हीलचेअर बास्केटबॉल: भारत विरुद्ध स्कॉटलंड
२७ जुलै (सोमवार)
ॲथलेटिक्स: मुरली श्रीशंकर, पूजा सिंग, तेजस्विन शंकर
जलतरण: साजन प्रकाश
वेटलिफ्टिंग: ज्ञानेश्वरी यादव, बिंदयाराणी देवी
महिला शॉटपुट: अंतिम फेरी
२८ जुलै (मंगळवार)
ॲथलेटिक्स: सीमा पुनिया, मनजीत कौर
जलतरण: श्रीहरी नटराज
लॉन बाउल्स: नवनीत सिंग / दिनेश कुमार
वेटलिफ्टिंग: हरजिंदर कौर
१०,००० मीटर धाव: गुलवीर सिंग
२९ जुलै (बुधवार)
लॉन बाउल्स: नवनीत सिंग / दिनेश कुमार
महिला एकेरी: नयनमोनी सैकिया
वेटलिफ्टिंग: संजना, दिलबाग सिंग
ॲथलेटिक्स: समरदीप गिल, तजिंदरपाल सिंग, अनिमेश कुजूर
जलतरण: आर्यन नेहरा, सुयश जाधव
३० जुलै (गुरुवार)
ट्रॅक सायकलिंग: सायकॉन सिंग
ॲथलेटिक्स: नीरज चोप्रा, रोहित यादव (भालाफेक), तेजस्विन शंकर
वेटलिफ्टिंग: मार्टिना देवी, लवप्रीत सिंग
३१ जुलै (शुक्रवार)
ॲथलेटिक्स: मिश्र ४x४०० मीटर रिले, तेजस्विन शंकर
ट्रॅक सायकलिंग: दिनेश कुमार, रोजन यंगलेम
ज्युदो: अस्मिता देव, श्रद्धा चोप्रा, यामिनी मौर्य आणि इतर
१ ऑगस्ट (शनिवार)
ॲथलेटिक्स: शुभम जुयाल, प्रियांका गोस्वामी
ज्युदो: अरुण कुमार, उन्नती शर्मा, हर्ष टोकस आणि इतर पदक फेरी
२ ऑगस्ट (रविवार)
ज्युदो: अवतार सिंग (१०० किलो), यश घनघास (+१०० किलो)
भारताला पदकांच्या आशा
यंदाच्या स्पर्धेत भारताला भालाफेक, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ॲथलेटिक्स, ज्युदो आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग या खेळांमध्ये पदकांची सर्वाधिक अपेक्षा आहे. विशेषतः नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहाई यांच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
क्रिकेट, बॅडमिंटन आणि नेमबाजी या पारंपरिक पदकविजेत्या खेळांचा समावेश नसला तरी भारतीय खेळाडू इतर स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करून पदकतालिकेत आपला ठसा उमटवण्याच्या तयारीत आहेत.

