(गावखडी /वार्ताहर)
श्री क्षेत्र अक्कलकोट येथुन श्री स्वामी देवांची पालखी परिक्रमा – मुळ पादुका, श्री क्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ गांवखडी येथे आज बुधवार दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९-०० वाजता दाखल झाल्या आहेत. दर्शनाची वेळ स.०९-३० ते दु.०३-३० पर्यंत होती. दुपारी १२-०० वा. श्री स्वामी देवांना नैवेद्य अर्पण करून महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मठ गांवखडी व श्री स्वामी समर्थ दिगंबर चँरिटेबल ट्रस्ट यांनी अथक परिश्रम घेतले.
(फोटो: दिनेश पेटकर, गावखडी)

