(गणपतीपुळे / वैभव पवार)
लोकनेते शामरावजी पेजे यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटातून सुप्रिया माधव अंकलगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर महाविद्यालयीन गटातून तन्वी चंद्रशेखर सुर्वे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग असलेल्या व कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण विभागाने राबविलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल आज सोमवारी घोषित करण्यात आले. यामध्ये खुल्या गटात सुप्रिया माधव अंकलगे वाटद खंडाळा या प्रथम, जयेश राजाराम पवार साडवली देवरुख द्वितीय, सचिन शंकर गावडे देवरुख तृतीय, सुहास तानाजी गेल्ये शिवणे, संगमेश्वर उत्तेजनार्थ, योगेश अरविंद मुळे पिरंदवणे संगमेश्वर उत्तेजनार्थ तर महाविद्यालयीन गटात कुमारी तन्वी चंद्रशेखर सुर्वे पाली- प्रथम, कुमारी समरीन खलील कुणके चिपळूण- द्वितीय, कुमारी वैष्णवी गजानन हळदे चिपळूण – तृतीय व श्रावणी सुभाष थुळ सत्कोंडी हिने चतुर्थ क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
या सर्व विजेत्यांना येत्या १७ जानेवारी २०२६ रोजी अण्णासाहेब पेजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण विभागाचे प्रमुख अरुण मोर्ये दिली आहे.

