(राजापूर / तुषार पाचलकर)
ग्रुप ग्रामपंचायत मिळंद-सावडाव मार्फत मुख्यमंत्री पंचायत राज अभिमान व आदिशक्ती महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रम नुकताच मिळंद गुरुववाडी येथील अंगणवाडीत उत्साहात आणि आनंदात संपन्न पडला. यावेळी महिला व किशोरवयीन मुलींचा एच. बी. तपासणी व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. आदिशक्ती अभियान मिळंद च्या सरपंच कीर्ती आयरे यांच्या अध्यक्षेतेखाली हा महत्वाचा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.
समितीच्या कार्यावर प्रकाश टाकताना आदिशक्ती महिला सक्षमीकरण समितीचे कार्य महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर आधारित आहे. समाजात संवेदनशीलता निर्माण करणे, महिलांमध्ये जनजागृती घडवून आणणे, लिंगभेद निर्मूलन, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व वाढविणे, बालविवाह रोखणे तसेच लैंगिक व शारीरिक अत्याचाराविरोधात हिंसाचार मुक्त समाज घडविणे या प्रमुख उद्दिष्टांवर समिती आपले लक्ष केंद्रित करत आहे.
यासोबतच पंचायत राज व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणे, त्यांना शिक्षण, रोजगार, निर्णयप्रक्रिया व हक्कांमध्ये समान संधी मिळवून देणे आणि शासकीय योजनांचा लाभ तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न समिती सातत्याने करत आहे.
यावेळी आदिशक्ती महिला सक्षमीकरण समिती च्या सचिव आणि अंगणवाडी सेविका सविता चव्हाण सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी अमृता शिवलकर, माजी जिल्हापरिषद सदस्या दुर्वा तावडे सह बहुसंख्येने आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थिती होत्या.
यावेळी जवळेथर च्या वैद्यकीय अधिकारी संयुक्ता घाडगे व समुदाय अधिकारी हातदेचे प्रविण होन्नेकर यांनी याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता चव्हाण तर अमृता शिवलकर यांनी आभार मानले

