(चिपळूण)
विद्यार्थ्यानो आपले आयुष्य घडविताना जिद्द ठेवा; अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, कष्टाला पर्याय नाही, हे करत असताना आपल्याला अनंत अडचणी येतात.मात्र जिद्द, चिकाटी ठेवली तर हे अडथळे आपल्याला यशाच्या शिखरावर नेतात.असे मत डीबीजे महाविद्यालयाच्या उडान महोत्सवाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.यावेळी कर्नल श्री सुरेश शिंदे, संस्थेचे चेअरमन श्री मंगेश तांबे, व्हा.चेअरमन डॉ.दिपक विखारे, वार्षिक स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा.अनिल पुनवतकर मंचावर उपस्थित होते.
येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाचे ‘उडान युवा मनाची २०२५ महोत्सव संपन्न होत आहे. या महोत्सवात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या समारंभाला पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व निवृत्त लेफ्ट. कर्नल सुरेश शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी केले. मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. बापट यांनी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना या दोन्ही विभागांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच संस्थेचे व्हा.चेअरमन डॉ. दिपक विखारे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थी जीवनामध्ये एन.एस एस.व एन सी.सी. हे दोन्ही विभाग महत्वपूर्ण भूमिका बजावतात. एक विभाग समाज घडवितो दुसरा विभाग समाजाचे संरक्षण करतो असे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे निवृत्त लेफ्ट. कर्नल सुरेश शिंदे यांनी देशासाठी जवानांचे बलिदान महत्वपूर्ण आहे, ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा ;अपयशाने खचून जाऊ नका, असे मार्गदर्शन केले. तर पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने यांनी आपला जीवन-प्रवास कथन करताना विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आदर्शवत जीवन जगले पाहिजे. तसेच विद्यार्थी जीवनात शिक्षक व पालक हे मोलाची व महत्वपूर्ण भूमिका बजावतात. एन.एस.एस.व एन.सी.सी. हे दोन्ही विभाग विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचे काम करतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रा. अविनाश पालशेतकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय तर डॉ .ज्ञानोबा कदम यांनी वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अहवाल वाचन केले. मेजर नम्रता माने यांनी एन.सी.सी. विभागाचे अहवाल वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. अतुल चितळे, खजिनदार श्री. संजीव खरे, नियामक समिती सदस्य श्री. नयनीश गुढेकर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सौ. जयंती काटदरे व प्रा.राजरत्न दवणे यांनी केले. तर आभार राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी अनुष्का रोकडे हिने मानले.

