(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अथायु हॉस्पिटल कोल्हापूर,उदयजी सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रुग्णांसाठी मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे व लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा ना. श्री. उदयजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांना या आरोग्य शिबीर लाभ घेता येणार आहे
हे शिबिर शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे शिबिर होणार आहे.शिबिरास येताना सर्व जुने रिपोर्ट्स, सोनोग्राफी, पायाचा डॉपलर तपासणी रिपोर्ट तसेच मूळ प्रत रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन येणे,
ज्या रुग्णांना दुर्बिणीद्वारे व लेसरद्वारे उपचार लागणार आहेत अश्या रुग्णांना मोफत उपचार अथायु हॉस्पिटल, कोल्हापूरमध्ये केले जाणार आहेत
या शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून ना. श्री. उदयजी सामंत, आमदार श्री किरण (भैय्या) सामंत तसेच श्री. मदन गोरे (अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर), येथील अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार श्री. किरण सामंत व आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 8928736999 संपर्क करावे गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबीरामध्ये घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

