(चिपळूण)
शहरातील मार्कंडी परिसरात एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मृत तरुणाची ओळख शुभम रवींद्र सावर्डेकर (वय २३, रा. मार्कंडी) अशी आहे.
सावर्डेकर कुटुंब अनेक वर्षांपासून मार्कंडी येथे वास्तव्यास आहे. शुभम हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. घरातच त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
शुभमचे वडील रवींद्र सावर्डेकर हे कोकण रेल्वे मध्ये नोकरी करतात. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सावर्डेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा कुटुंबीयांचा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

