(रत्नागिरी)
नवोदित गायक कलाकारांसाठी मैलाचा दगड ठरलेली व 1981 पासून सातत्याने होणारी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता रत्नागिरीमध्ये संपन्न झाली. खल्वायन रत्नागिरी संस्थेच्या सहकार्याने संपन्न झालेली ही ह्या स्पर्धेची रत्नागिरी केंद्रांवरील प्राथमिक फेरी होती.दादर माटुंगा केंद्राचे कार्यवाह श्री. सतीश जोशी या स्पर्धेसाठी उपस्थित होते. अंतिम फेरी मुंबई येथे दि. 11 जानेवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे.
या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी पुढील चार विद्यार्थ्यांची निवड झाली. 1) आदित्य आनंद लिमये ( वि.स. गांगण महाविद्यालय, रत्नागिरी) 2) सार्था मनिषा नरेंद्र गवाणकर ( अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी. ( 3) हर्ष महेश बोंडाळे ( अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी ) 4) स्वरा अमित भागवत ( कै. टी.पी. केळकर सायन्स ज्युनिअर कॉलेज, रत्नागिरी.)
सदरहू स्पर्धेत राजापूर, चिपळूण, देवगड, संगमेश्वर, रत्नागिरी येथील महाविद्यालयातील 18 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेला तबला व हार्मोनियमची साथसंगत श्री. प्रथमेश शहाणे व श्री. मंगेश मोरे यांनी केली. स्पर्धेचे परीक्षण श्री. राम तांबे व श्रीमती अनिता कान्हेरे- आगाशे यांनी केले.

