(चिपळूण)
खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनी परिसरात ठेवलेला स्टेनलेस स्टील पाइप चोरीला गेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
हैदरअली शहा (वय ४०, रा. सती, चिपळूण) असे आरोपीचे नाव असून, फिर्याद कंपनीचे सुरक्षारक्षक महेश जाधव (वय ५०, रा. अलोरे सोनारवाडी) यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मागील बाजूस इटीपी प्लॅटशेजारील मोकळ्या जागेत तीन फूट लांबीचा आणि तीन इंच रुंदीचा, किंमत सुमारे सहा हजार रुपये असलेला स्टेनलेस स्टील पाइप ठेवण्यात आला होता.
दरम्यान, हैदरअली शहा हा पाइप चोरून नेत असताना त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून पाइप जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

