(राजापूर)
शहरातील दिवटेवाडी परिसरातील 20 वर्षीय तरुणीचा तापाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (मंगळवार) दुपारी सुमारे 3.30 वाजता घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणीचे नाव श्रावणी मनोज पवार (वय 20, रा. दिवटेवाडी, राजापूर) असे असून, तिच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणीला मागील तीन दिवसांपासून ताप होता. तिला घरच्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तब्येत सुधारल्याने ती आज सकाळी कॉलेजला गेली होती. मात्र सायंकाळी परतल्यानंतर पुन्हा ताप चढल्याने तिला राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. राजापूर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, श्रावणीच्या अकस्मात मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

