(संगमेश्वर / एजाज पटेल)
काही दिवसांपूर्वी कुरधुंडा बौद्धवाडी येथील बेपत्ता झालेल्या आशिष प्रकाश मोहिते या 42 वर्षीय युवकाचा मृतदेह कुरधुंडा -कोळंबे या दोन गावाच्या सीमेवर असलेल्या बस स्टॉप च्या मागे झाडीझूडपात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आशिष मोहिते याला दारूचे व्यसन होते. तो दोन ते तीन दिवस घरात कोणाला काहीही न सांगता कोठेही राहत असे. आशिष याचे वडील प्रकाश विठोबा मोहिते यांनी पोलिसांना दिलेली माहिती प्रमाणे 12 ऑक्टोबर रोजी कोळंबे येथे जातो असे सांगून आशिष घरातून निघून गेला होता.मात्र तो परत न आल्याने त्याचा गावात तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्याची माहिती मिळाली नाही. तो मित्रांकडे किव्हा नातेवाईकांकडे असेल तो परत घरी येईल असा समज करून त्यांनी अधिक चौकशी केली नाही.
आशिष याचा मित्र नितेश जाधव याने कुरधुंडा -कोळंबे या दोन गावाच्या सीमेवर असलेल्या बस स्टॉप च्या मागे झाडीझूडपात आशिष चा कुजलेल्या अवस्थेत त्याला मृतदेह दिसून आल्याची माहिती प्रकाश मोहिते यांना दिली. त्या नुसार त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तशी फिर्याद नोंदवली असून आकस्मिक मृत्यू म्हणून संगमेश्वर पोलिसांकडून नोंद करून अधिक तपास सुरु आहेच.

