(रत्नागिरी / वार्ताहर)
लांजा तालुक्यातील कोट ग्रामपंचायतीत ‘टीबी मुक्त भारत’ मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांची एक्स-रे, बीपी, शुगर, रक्त, लघवी आणि स्पुटम तपासणी यांसह विविध मोफत वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत ग्रामपंचायत अधिकारी श्री. विक्रांत वि. साळवी यांनी केले. या उपक्रमात पोलिस पाटील श्री. दत्ताराम गोरुले, श्री. निवृत्ती वाकडे आणि श्री. प्रकाश घडशी यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच मा. श्रीमती निशिगंधा न. नेवाळकर होत्या. यावेळी आरोग्य निरीक्षक श्री. डी. व्ही. गुरव यांनी कीटकजन्य व जलजन्य आजारांबाबत ग्रामस्थांना आवश्यक ती काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले.
या आरोग्य शिबिरासाठी DPS श्री. एन. वाय. सुर्वे, PPM श्री. श्रीकांत सावंत, STS श्री. मिलिंद संसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. कामत, CHO श्री. एम. बी. येसरे, एक्स-रे टेक्निशियन श्री. निलेश हंगे, गटप्रवर्तक श्रीम. एस. एस. लोटणकर, ANM श्रीम. एम. एम. आग्रे, MPW श्री. एस. एम. सोळंकी व श्री. एस. ए. कांबळे, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. पंकज कालकर तसेच आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, माजी उपसरपंच श्री. संजय पाष्टे आणि कोट-आगरगाव ग्रामस्थ तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
छायाचित्र:
कोट ग्रामपंचायतीत आयोजित ‘टीबी मुक्त मोहिम’ शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. कामत, आरोग्य निरीक्षक श्री. दिलीप गुरव, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. पंकज कालकर, श्री. मिलिंद संसारे आणि आरोग्य पथक सहभागी.
(छायाचित्रकार – दिनेश पेटकर, गावखडी)