(जाकादेवी / संतोष पवार)
युवा परिषद यांच्या वतीने रविवार दि.८ जून रोजी सकाळी १० वा. बुद्धा की काल मार्क्स या विषयावर दिल्ली येथील इतिहासाचे गाढे अभ्यासक तसेच जवाहर नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. वृत्तांत मानवटकर यांचे विशेष मार्गदर्शन या परिषदेत होणार आहे. रत्नागिरी युवा परिषद आयोजित बुद्धा की कार्ल मार्क्स या विषयावरील महत्वपूर्ण परिषद विपश्यना केंद्र, (सभागृह) एकदंत नगर रत्नागिरी ( मुकादम हॉस्पिटल नजीक )संपन्न होणार आहे.
तरी बहुजन समाजातील मान्यवर व्यक्ती, कार्यकर्ते तसेच बौद्ध व आंबेडकरी अनुयायी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन या युवा परिषदेच्या वतीने आयोजक निहाल हातखंबेकर, संदेश कांबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सौरभ आयरे, विनोद पात्रोट यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन युवा परिषद यांनी केले आहे