(पाली / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचा व कोकणातील प्रसिद्ध श्री खड्गेश्वर संस्था वर्धक मंडळी, देवळेचा वार्षिक महाशिवरात्र उत्सव सोहळा दि.२३ ते २८ फेब्रुवारीपर्यंत मंदिरामध्ये पार पडणार आहे.या सोहळ्यासाठी मंदिरात राज्यासह देशविदेशातील भाविक हजेरी लावून, श्रींची सेवा करीत असतात. उत्सव काळात दररोज धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.
यावर्षीचा वार्षिक महाशिवरात्र उत्सव सोहळा दि.२३ ते २८ फेब्रुवारीपर्यंत होणार असून उत्सव काळात दररोज रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत आरती, मंत्रपुष्पांजली,छबिना असे धार्मिक कार्यक्रम होतील. यात कीर्तनकार ह.भ.प. श्री. भालचंद्र बुवा देव, केज, जि.बीड, संवादिनी साथ हेमंत देशमुख रत्नागिरी, तबला साथ सुधीर जोशी (उगार) हे देतील. रविवार २३ फेब्रुवारी रोजी रात्रौ ८.०० वाजता मंत्रजागर, ९.०० ते ११.०० वा.पर्यंत आरती, छबिना. रात्री ११.०० वाजता कीर्तन पुष्प १, सोमवार २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा (पंचक्रोशी मर्यादित),रात्रौ ११ वा. कीर्तन पुष्प २, मंगळवार २५ रोजी सायंकाळी ३ ते ४ वाजेपर्यंत वार्षिक सभा, सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत कीर्तन पुष्प ३, सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत काव्य मैफल सादरकर्ते कवितांगण ग्रुप, देवळे, रात्रौ ११ वाजता जोडी तुझी माझी स्पर्धा होममिनिस्टर (खुलागट), बुधवार २६ रोजी महाशिवरात्र उत्सव सायं. ५.३० ते ९.०० वाजेपर्यंत, ९.३० स्पर्धा बक्षिस समारंभ कै. सुधाकर वळामे स्मृती भजनसेवा (स्थानिक भजन मंडळे) रात्रौ ११ ते २.३० वाजेपर्यंत आरत्या व छबिनारात्रौ २.३० ते ४.३० वाजेपर्यंत कीर्तन पुष्प ४, गुरुवार २७ रोजी सायं. ०४ ते ०६ वाजेपर्यंत कीर्तनपुष्प ५, शुक्रवार २८ रोजी दुपारी १२.३० ते २.३० महाप्रसाद. असे कार्यक्रम होतील. उत्सवकाळात संस्थेतर्फे मंदिरात केल्या जाणाऱ्या ‘श्री’ सेवेसाठी विश्वस्त मंडळाने रुद्रावर्तन-युक्त अभिषेक१५१ रुपये,एकादशणी (रुद्र / महिम्न) ३०१रुपये,लघुरुद्र २५०१रुपये रक्कम निश्चित केलेली आहे
सर्व शिवभक्तांनी महाशिवरात्र उत्सव काळात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री खड्गेश्वर संस्था वर्धक मंडळी, देवळेचे कार्यवाह सुबोध स.करकरे, अध्यक्ष श्रीकांत भा.वळामे यांनी केले आहे.