(तरवळ / अमित जाधव)
रघुकुल शैक्षणिक ट्रस्ट डोंबिवली (पूर्व) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय विविध कला गौरव स्पर्धा २०२४ या स्पर्धेमध्ये मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत या स्पर्धेवर आपली मोहर उमटवली आहे.
नोहेंबर महिन्यात झालेल्या या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता .त्या मध्ये सात विद्यार्थ्यांना कला गौरव पुरस्कार मिळाला आहे ,त्या मध्ये सानवी संदीप खानविलकर हिला कलादर्पण पुरस्कार मिळाला आहे, पूर्वी प्रभाकर अजगोलकर हिला कला श्री पुरस्कार, सृष्टी मंगेश जाधव हिला कलारत्न स्टेट हा पुरस्कार मिळाला आहे, श्रावणी राजेश लोगडे कला दर्पण हा पुरस्कार तर अंश अभिषेक सुर्वे याला कला दर्पण पुरस्कार मिळाला आहे. तसेच वेदांत सुरेंद्र घवाळी श्री स्टेट टू पुरस्कार तर पुर्वा प्रशांत कोलगे हिला कला दर्पण पुरस्कार मिळाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना ट्रस्ट च्या वतीने प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात आले.या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे कला शिक्षक शाम पवार यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या राज्यस्तरीय विविध कला गौरव स्पर्धेतील यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम तसेच सर्व संचालक मंडळाने या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कला शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.