योजना बंद केल्याचा आरोप खोडसापणाचा: गावातील पाणीपुरवठा सुरळीत
( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायतचे सरपंच यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा बंद केला असा आरोप करून सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी तसेच पूर्ववत पाणीपुरवठा सुरु करावा अशा आशयाचे निवेदन दोन दिवांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र यानंतर आता सरपंच सुवरे यांनी देखील ॲक्शन मोडवर आले असून पाणी पट्टी वसुली झाली नाही. कर्मचारी वेतन न मिळाल्याने त्यांनी पाणी सुरु केले नाही. कर्मचाऱ्याला बोलावून दि. ११/०१/२०२४ पाणी पुरवठा सुरळीत चालू देखील करण्यात आलेला आहे. असे थेट पत्र आता सरपंच यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांना लिहिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, मौजे तुरळ हरेकरवाडी महसूल गाव येथील नळपाणी योजनेचे लाभार्थी २३ पैकी १८ लोकांनी पैसे मार्च अखेर भरले असून ५ लोकांकडून रु. पाच हजार शंभर रुपये येणे बाकी आहे. तसेच २९ कुटुंबाकडून रु. ४१ हजार चारशे रुपये येणे बाकी आहे. पाणीपट्टी वसुली नसल्याने वीजबिल रु.२३ हजार तीनशे चाळीस रुपये थकित आहे. तसेच कर्मचारी वेतन देणे आहे. ग्रामसभा दि. १०/१२/२०२४ रोजी पाणीपट्टी भरणा करण्याबाबत आवाहन करण्यात आले मात्र पाणी पट्टी वसुली झाली नाही. कर्मचारी वेतन न मिळाल्याने त्यांनी पाणी सुरु केले नाही. मात्र कर्मचारी यांना बोलावून दि. ११/०१/२०२४ पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. हरेकरवाडी या गावात विंधन विहिरीवरुन छोट्या योजना करण्यात आल्या असून या जोडणेतून कुटुंब पाणीपड्डी आकारणीतून कमी करण्यात आली आहेत. हरेकरवाडी न.पा.पु. योजेनेत सध्या ६८ कुटुंबे समाविष्ट असून त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.
मताधिक्य न मिळाल्याचा राग धरून….
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत टंचाई काळात सुरु असलेल्या योजनेचे पाणी विहिरीतील पाणी आटत असल्याने पर्यायी व्यवस्था ग्रामसभेच्या ठरावानुसार डिकेवाडी विहिरीवरून योजना करणेबाबत मागणी करणेत आली. त्यानुसार जल जीवन मिशन मधून योजनेचे कमाला मंजुरी देणेत आली व काम सुरु करणेत आले. या विहिरीतले पाणी पिण्यास दुषित नाही. विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार मा. शेखर निकम यांना मताधिक्य न मिळाल्याचा राग धरून योजना बंद करण्यात आलेला आरोप हा खोडसार आहे असेही सरपंच यांनी पत्रात नमूद केले आहे.
हेतूपुरस्कर राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न?
प्राथमिक शाळा हरेकरवाडी नळ कनेक्शन हे हरेकरवाडी न.पा.पु. योजनेवर असल्याने पाणी देता आले नाही. दि.११/०१/२०२५ रोजी योजना सुरु करणेत आलेली आहे. माझे कडून कर्तव्य पार पाडत असताना गैरवर्तन, हेळसांडपणा केलेला नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९४८ चे कलम ३९ प्रमाणे माझेकडून कोणतेही कर्तव्यात कसूर केलेली नाही. अर्जदार यांनी हेतूपुरस्कर राजकीय स्वरूप देऊन गावामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे काम केले आहे.