घरातली मोठी लोक नेहमी रात्री नखे कापण्यास मनाई करतात आणि काही ठराविक दिवशी नखे कापण्यासही मनाई करतात. मात्र यामागे काही खास कारणे आहेत. हिंदू धर्मात नखे कापण्यासाठी शुभ दिवस आणि वेळ सांगितली आहे. ज्योतिष शास्त्र आणि हिंदू धर्मानुसार सात दिवसांचा सप्ताह असतो. हे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी निगडीत आहेत. प्रत्येक वाराशी निगडीत काही ना काही समज, परंपराही आहेत. धर्म आणि ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर म्हणजेच रात्री कधीही नखे कापू नयेत. रात्री नखे कापल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. कारण संध्याकाळ आणि रात्र ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. यावेळी नखे कापण्यासारख्या गोष्टी केल्याने ती क्रोधीत होते आणि ती घरात राहत नाही. त्याचप्रमाणे आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी नखे कापल्याने जीवनावर वेगवेगळे परिणाम होतात, असे मानले जाते. चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी केलेल्या या कृत्यांमुळे देवी-देवतांची नाराजी होते. यामुळे जीवनात दारिद्र्य येते आणि केलेले काम बिघडते.
नखे कधी कापावी या बदल बरेच मतमतांतर आहेत. सामुद्रिक शास्त्रामध्ये नखे कधी काढावी या बदल माहिती दिली आहे. सामुद्रिक शास्त्र हे एक खुप मोठे शास्त्र आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टीचा अभ्यास केला गेला आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवावर या शास्त्रात माहिती दिली आहे. नखे वाढवल्याने देहात तमोगुण वाढतो. नखे एका विशिष्ट दिवशी काढल्याने आपल्याला चांगला फायदा होतो, तसेच काही दिवस असे आहेत त्या दिवशी नखे कापणे चुकीचे असते. जर त्या दिवशी नखे कापली तर आपल्याला काही प्रमाणत तोटे होण्याची शक्यता असते.
सोमवार – सोमवारी नखे कापणे शुभ असते. सोमवारचा संबंध भगवान शिव, चंद्र आणि मनाशी आहे. सोमवारी नखे कापल्यास तम गुण नष्ट होतात, सोबतच घरातील आर्थिक स्थिती मजबूत बनते. सोमवारी नख कापल्याने आपले आयुष्य सात वर्षांनी वाढते. कारण या दिवशी ग्रहांकडून येणारी किरणे आपल्या शरीरासाठी अत्यंत शुभ असतात, असे मानले जाते.
मंगळवार- मंगळवारी नखे कापण्यास मनाई आहे. कारण हा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे. तर ज्यांना कर्ज आहे, त्यांनी मंगळवारी नखे कापल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. परंतु जे लोक हनुमानाचे मंगळवारी व्रत करतात त्यांनी मंगळवारी नखे कापू नयेत. मंगळवार हा हनुमान आणि मंगळ ग्रहाचा वार आहे या दिवशी नखे काढणे अशुभ मानले जाते. मात्र तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर मंगळवारी नखे कापल्याने कर्ज कमी होण्यात मदत होते, असे मानले जाते.
बुधवार- बुधवारी नखे कापणे शुभ असते. बुधवारी नखे कापल्याने मोठा आर्थिक लाभ होतो. नोकरी-व्यवसायात प्रगती होते, कमाई वाढते. बुधवार हा श्री गणेशांचा वार व बुध ग्रहाशी संबंधीत वार आहे, ह्या दिवशी नखे अवश्य काढावीत. धनलाभ तर होतोच सोबतच प्रगतीचे मार्ग देखील उघडे होतात.
गुरुवार – गुरुवारीही नखे कापणे निषिद्ध आहे, तर गुरुवारी नखे कापल्याने सत्व गुण वाढतात. गुरुवार भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती ह्यांचा वार असल्याने या दिवशी आपण नखे चुकूनही काढू नये दुर्भाग्य आपला पिछा सोडणार नाही. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात आणि पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होतात.
शुक्रवार- नखे कापण्यासाठी शुक्रवार हा सर्वात शुभ दिवस आहे. शुक्रवारी नखे कापल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरपूर संपत्ती प्राप्त होते. शुक्रवारी नखे कापल्याने जीवनात संपत्ती, सुख, समृद्धी आणि सौंदर्य वाढते आणि जोडीदारांसोबतचे नाते मजबूत होते. या दिवशी नखे काढल्याने नातेसंबंधात गोडवा येतो. भौतिक सुखात वृद्धी होते.
शनिवार- शनिवारी नखे कापण्याची चूक करू नये. शनिवारी नखे कापल्याने शनिदेवाचा कोप होतो आणि मानसिक आणि शारीरिक वेदना होतात. तसेच शनिवारी नखे कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते, साडेसाती मागे लागते. आपल्या धर्मशास्त्रात आणि पुराणात म्हटले आहे की, शनिवारी नखं कापल्यामुळे आपले आयुष्य सात वर्षांनी घटते.
रविवार- रविवारी नखे कापणे फारच अशुभ आहे. रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे नखे आणि केस कापण्याची चूक करू नका. रविवारी नखे कापल्याने आत्मविश्वास कमी होतो, यशात अडथळे निर्माण होतात आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. विवारचा दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी नखे काढल्याने भाग्याची साथ मिळते. मात्र लक्षात ठेवा की उपवास किंवा व्रत असतील तर नखे चुकूनही काढू नका व्रताचे संपूर्ण फळ मिळणार नाही. एकादशी, चतुर्थी, अमावस्या या दिवशी नखे कापूच नयेत.