सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष सचिन लांजेकर, रुपेश शेलार, बबलू कोतवडेकर, राकेश आंब्रे, प्रविण पावसकर, मंगेश शेट्ये, अमोल लांजेकर, पुंडलीक पावसकर, प्रमोद भडकमकर, अजय नाचणकर, जिल्हा पदाधिकारी रघुविर शेलार, दिपक राऊत, संदीप पवार, दिनेश नाचणकर, मकरंद पावसकर, मनोहर रहाटे, अनंत भडकमकर, नारायण झगडे, सौ.संध्या नाचणकर यांनी मेहनत घेतली. यावेळी कीशोर लांजेकर, सुहास चव्हाण, मारुती सकपाळ, सुरेंद्र लांजेकर, मयुर बळगे, शशिकांत कोतवडेकर, प्रशांत बंदरकर, विठ्ठल पावसकर, श्री.दादा ढेकणे, अमोल झगडे, आप्पा पुनसकर, सौ. रचना राऊत, सौ.निशिगंधा कोतवडेकर, सौ.युक्ता राऊत, सौ.मधुश्री पुनसकर, सौ. शर्मिला कोतवडेकर, सौ. मनस्वी लांजेकर, श्रीमती अनिता खानविलकर, श्रीमती पुनसकर, सौ.बळगे, सौ. ढेकणे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन प्राध्यापिका रसिका नाचणकर यांनी केले
तेली समाज सेवा संघाच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंतीचे आयोजन
(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुका आणि जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४००व्या जयंतीचे आयोजन जिल्हा तेली समाज सेवा संघ संपर्क कार्यालय (डाँ. पंकज बंदरकर यांचे घर) तेलीआळी रत्नागिरी येथे करण्यात आले होते. जेष्ठ समाज बांधव माजी अध्यक्ष विजय पुनसकर, माजी मुख्याध्यापक सुदाम आंब्रे यांच्या शुभहस्ते श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या बंधु भगिनींच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात आरती करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधत डॉ. मंदार हरिश्चंद्र गीते यांचे नैसर्गिक शेती याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी जवळजवळ दोन तास मार्गदर्शन करताना अनेकांच्या प्रश्नांची उदाहरणांसहीत उत्तरे देऊन समाधान केले. यावेळी प्रयोगशील शेतकरी श्री. योगेश कुर्ले व नितीन कुर्ले हे या मार्गदर्शनासाठी लांजा येथून उपस्थित राहीले होते.
Leave a Comment
Leave a Comment