(सावर्डे / वार्ताहर)
जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासह धावण्याची आवड वाढवणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सावर्डे येथे शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता ‘चिपळूण हाफ मॅरेथॉन २०२६ – मिनी नाईट प्रोमो रन’चे आयोजन करण्यात आले आहे. संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण आणि लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
‘Run to Save Water’ अर्थात ‘पाणी वाचवा’ हा संदेश या धावण्याच्या उपक्रमातून देण्यात येणार आहे. आरोग्य संवर्धनासोबतच जलसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
या नाईट प्रोमो रनमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून, सर्वांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे युवक, क्रीडाप्रेमी, धावपटू आणि आरोग्याविषयी जागरूक असलेल्या नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमासाठी डॉ. अरुण पाटील अध्यक्ष, डॉ. दर्शना पाटील सचिव, तर मिलिंद टेटांबे खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धावण्यासोबतच जलसंवर्धनाचा संदेश समाजात पोहोचवावा, असे आवाहन केले आहे.
ही ‘मिनी नाईट प्रोमो रन’ शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता सावर्डे, ता. चिपळूण येथे होणार असून, सहभाग पूर्णपणे मोफत आहे. सहभागी धावपटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


